वचन

वचन (Singular-Plural)


वचन :-
कोणत्याही नामावरून त्याने दाखवलेल्या वस्तूंची संख्या एक आहे की , एकापेक्षा अधिक आहे हे
समजते ,त्यालाच त्या नामाचे वचन म्हणतात .
वचनचे दोन प्रकार आहेत .

एकवचन :- ज्या नामावरून एकाच व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे एकवचन असते.
उदाहरणार्थ:फुल , झाड , वही

अनेकवचन :- ज्या नामावरून अनेक व्यक्ती अथवा वस्तूंचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे अनेकवचन असते. उदाहरणार्थ:फुले , झाडे , वह्या

खालील अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.

१) एक घर - अनेक घरे
२) एक सफरचंद - अनेक सफरचंदे
३) एक फूल - अनेक फुले
४) एक चिमणी - अनेक चिमण्या

वरील वाक्यांतील -

१) घर - या नामावरून एका घराचा बोध होतो.
    घरे - या नामावरून अनेक घरांचा बोध होतो.
२) सफरचंद - या नामावरून एका सफरचंदाचा बोध होतो.
    सफरचंदे - या नामावरून अनेक सफरचंदांचा बोध होतो.
३) फूल - या नामावरून एका फुलाचा  बोध होतो.
    फुले - या नामावरून अनेक फुलांचा बोध होतो.
४)चिमणी - या नामावरून एका चिमणीचा बोध होतो.
    चिमण्या - या नामावरून अनेक चिमण्यांचा बोध होतो.
 
एकवचनअनेकवचन
घरघरे
सफरचंदसफरचंदे
फूलफुले
चिमणीचिमण्या

वचनबदल :-
एकवचनी शब्दांचे अनेकवचनी शब्दांत रूपांतर करणे आणि अनेकवचनी शब्दांचे एकवचनी शब्दांत रूपांतर करणे , याला वचनबदल असे म्हणतात .
उदाहरणार्थ :-

१) अनय वही आण .
वरील वाक्यात वही हे एकवचन आहे , त्याचे वचन बदल करून आपण वाक्य लिहू .
उ. अनय वह्या आण .

२) जय फळ खातो .
वरील वाक्यात फळ हे एकवचन आहे , त्याचे वचन बदल करून आपण वाक्य लिहू .
उ. जय फळे खातो .

१) पुल्लिंगी नामांचे अनेकवचन

आ <--> ए

 
एकवचनअनेकवचन
अभ्राअभ्रे
अंगरखाअंगरखे
अंगठाअंगठे
आंबाआंबे
ओढाओढे
ओटाओटे
उकिरडाउकिरडे
कायदाकायदे
काटाकाटे
कांदाकांदे
किनाराकिनारे
कोपराकोपरे
कोळसाकोळसे
कोल्हाकोल्हे
कुत्राकुत्रे
खड्डाखड्डे
खांदाखांदे
गळागळे
गोळागोळे
गोठागोठे
गुन्हागुन्हे
गुडघागुडघे
घोडाघोडे
चेहराचेहरे
चुल्हाचुल्हे
चिमटाचिमटे
झराझरे
झोकाझोके
टांगाटांगे
टिळाटिळे
ठिपकाठिपके
डबाडबे
डोळाडोळे
जिल्हाजिल्हे
ढिगाराढिगारे
तवातवे
तालुकातालुके
ताशाताशे
तुकडातुकडे
थवाथवे
दरवाजादरवाजे
दवाखानादवाखाने
दागिनादागिने
दाणादाणे
देखावादेखावे
दिवादिवे
धडाधडे
धबधबाधबधबे
धागाधागे
धंदाधंदे
नमुनानमुने
नकाशानकाशे
नालानाले
निखारानिखारे

२) स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन

१) अ <--> आ

 
एकवचनअनेकवचन
काचकाचा
खूणखुणा
चूकचुका
जखमजखमा
जीभजिभा
चिंचचिंचा
झुळूकझुळका
झोपझोपा
तारीखतारखा
नजरनजरा
फौजफौजा
बागबागा
बंदूकबंदुका
माळमाळा
मानमाना
मोटमोटा
मिरवणूकमिरवणुका
मौजमौजा
रांगरांगा
लाटलाटा
वाटवाटा
वेळवेळा
वीजविजा
वीटविटा 
सूनसुना
हाकहाका

२)  अ <--> ई

 
एकवचनअनेकवचन
अडचणअडचणी
आठवणआठवणी
ओळओळी
इमारतइमारती
केळकेळी
किंमतकिंमती
गायगायी
गोष्टगोष्टी
गंमतगंमती
चाहूलचाहुली
चोचचोची
जमीनजमिनी
जास्वंदजास्वंदी
दुपारदुपारी
दुर्बीणदुर्बीणी
तलवारतलवारी
तक्रारतक्रारी
पखालपखाली
पेन्सिलपेन्सिली
बोरबोरी
बोटबोटी
भिंतभिंती
मुलाखतमुलाखती
म्हैसम्हशी
रात्ररात्री
लकेरलकेरी
वेलवेली
विहीरविहिरी
सहलसहली
सकाळसकाळी
सायकल सायकली
सालसाली
हिरवळहिरवळी