नायक जदुनाथ सिंग, पीव्हीसी (२१ नोव्हेंबर, १९१६ काजुरी, शाहजहानपूर जिल्हा, उत्तर प्रदेश) - ६ फेब्रुवारी, १९४८) हे भारतीय सैनिक होते. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. इ.स. १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या त्यांनी दाखवलेल्या साहसासाठी भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार त्यांना देण्यात आला.
जदुनाथ हे १९४१ मध्ये ब्रिटीश भारतीय सैन्यात दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात बर्मामध्ये जपानी लोकांविरुद्ध लढले. नंतर त्यांनी भारतीय सैन्य दलातून १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भाग घेतला. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी नौशहरच्या उत्तरेस ताईन धर येथे दाखवलेल्या साहसासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले. सिंग यांनी नऊ जणांच्या फॉरवर्ड सेक्शन पोस्टवर ड्युटी होती. पाकिस्तानी सैन्य त्यांच्या जागेवर फार मोठ्या संखेने हल्ला करायला आले येऊन ठेपले होते. नायक जदुनाथ सिंग यांच्याकडे कमी सैन्य असूनही त्यांनी पाकिस्तानी सैन्याचे तीन प्रयत्न हाणून पाडले. दुसऱ्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. स्टेन गन हातात घेऊन त्यांनी पाकिस्तानी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले. हे करताना त्यांचा प्राण तिसऱ्या हल्लात गेला. शाहजहांपूरमधील क्रीडा स्टेडियम आणि कच्च्या तेलाचे टॅंकर सिंग यांच्या नावावरून ठेवले.