सर्वनाम

सर्वनाम (Pronoun)


सर्वनाम (Pronoun)  :-
नामाऐवजी  जो  शब्द  वापरतात  त्याला " सर्वनाम " म्हणतात.

खालील वाक्ये वाचा .
मयंक  हुशार  मुलगा  आहे.
मयंक  नियमित  शाळेत जातो .
मयंकला  खेळायला आवडते.
मयंकचे मोहक व  रोनित मित्र आहेत.

वरील  वाक्यांमध्ये  मयंक  नामाचा  वारंवार  उल्लेख  झालेला  आहे. त्यामध्ये  बदल करून
ती वाक्ये वाचूया.

तो  हुशार  मुलगा आहे.
तो  नियमित  शाळेत जातो .
त्याला  खेळायला आवडते .
त्याचे  मोहक  व  रोनित  मित्र  आहेत. 

वरील वाक्यात मयंक या नामाऐवजी  तो, त्याला, त्याचे यासारखे  शब्द  वापरले  जातात , त्यांना  सर्वनाम  म्हणतात.

नामाचे  उच्चार  वारंवार होऊ नये  म्हणून  त्याऐवजी  मी ,  तू , ते , तो , ती ,  त्यांनी ,  त्याने ,  आपण , त्याला ,  त्याचे ,  त्याच्या  ,  आम्ही  यासारखे  शब्द  वापरले  जातात , त्यांना  सर्वनाम  म्हणतात.
सर्वनाम  हे  नामाच्या  ऐवजी  येते.  परंतु  त्या  अगोदर  नामाचा  उल्लेख  आवश्यक  असतो.

उदाहरणार्थ :-
मी, आम्हीमाझे, आमचेह्यांच्यात, त्यांच्याततो, ती, ते
तू, तुम्हीतुझे, तुमचेत्याचे ,त्यांचेहा, ही, हे
मला, आम्हालात्याचे, त्यांचेमाझ्यात, आमच्यातमाझे, आमचे
तुला, तुम्हालाह्याचे, ह्यांचेतुझ्यात ,तुमच्याततुझे, तुमचे