राष्ट्रमाता जिजाऊ

 
राष्ट्रमाता जिजाऊ
जन्म १२ जानेवारी १५९८    —  मृत्यू १७ जून १६७४
आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज ह्या मराठ्यांच्या दोन छत्रपतींना घडविणार्या विश्ववंद्य आदर्श राजमाता जिजाउंना त्रिवार वंदन !   जिजाउञ्चा जन्म १२ जानेवारी १५९८ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई हिच्या पोटी झाला. म्हाळसाबाई हि निंबाळकर घराण्यातील होती.लखुजी जाधवाला दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि  बहाद्दुरजी, हे चार पुत्र आणि जिजाउ हि एक कन्या अशी पाच अपत्ये होती.शिक्षण-तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलीनप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले.तिला दांडपट्टा, अश्वारोहण वैगरे युद्ध कलांचे शिक्षण देण्यात आले.राज्यकारभाराचेही प्रशिक्षण मिळू लागले.
जिजाउं चा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांचेशी दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटाने संपन्न झाला. या प्रसंगी मालोजीला निजामशहा कडून पाचहजारी मनसब, शिवनेरी, व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहागीर म्हणून मिळाले. जिजाउंना एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकि चार मृत्यू पावली. संभाजी व शिवाजी हे दोन होत. शहाजीं नी जिजाऊ ना शिवनेरीवर किल्ल्यात सुरक्षित ठेवले. येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाउने शिवाजीस जन्म दिला. जिजाउचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते.त्यांनी पुण्याच्या आसपासचा अहमदनगर व विजापूरचा प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले परंतु विजापुरने ते लवकरच उध्वस्त केले . इ.स १६३९ ते १६४७ या काळात शहाजीने पुण्यात झांबरे  पाटलाकडून  जागा विकत घेवून लाल महाल ‘ नावाचा राजवाडा बांधला . जीजावू व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता. जिजाऊच्या आज्ञात शिवाजी आपल्या सवंगड्यासोबत युद्धकला शिकवू लागला. दऱ्याखोऱ्यात फिरू लागला. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे , येसाजी कंक , बाजी जेथे वैगरे शेतकरयांची मुले शिवाजीचे जिवलग मित्र बनले. सर्वावर जीजावूंचा मायेची नजर होती . शिवाजीसह  सार्वजण जिजाऊच्या आज्ञेत वागत होते.
१६ मे १६४० साली जिजाऊने शिवाजीचा  विवाह निंबाळकरांच्या सईबाईंशी लावून दिला. यावेळी शहाजी विजापूरतर्फे बंगलोर येथे आल्यामुळे लग्नास येवू शकले नाहीत.  अशा रीतीने जिजाऊ निंबाळकरांच्या मुलींची (सईबाईची) सासू बनली , तर वणजोगी निंबाळकरांची  मुलगी दीपाबाई (मालोजीची पत्नी) ही जिजाउंची सासू होती. २५ जूलॆ १६४८ साली जिंजा येथे शहजीस कपटाने कैद केले, हे काम वजीर मुस्तफाखान याने केले . १६ मे १६४९ रोजी जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीने हालचाली करून शहजींची सुटका केली. शिवाजीने १० नोव्हेंबर १६५९ साली अफझलखानाचा वध केला. आणि बाजी घोरपडेस ठार केले. मुस्तफखानाचे अगोदरच निधन झाले होते. अशा रीतीने जिजाउने पुत्र शिवाजीस आज्ञा करून पतीच्या अपमानाचा सूड घेतला. इ.स १६५५ साली जिजाऊचा जेष्ट पुत्र संभाजी विजापूरतर्फे लढतांना ठार झाला. १४ मे १६५७ रोजी शिवाजीची राणी सईबाई पुरंदर गडावर प्रसुत झाली. तिला पुत्र झाला . त्याचे नाव संभाजी ठेवले . शिवाजीचा हा पहिला पुत्र आणि जिजाऊचा फिल नातू. सभाजीची आई सईबाई हिचे ५ सप्टेबर १६५९ रोजी निधन झाले. २३ जाने.१६६४ साली तुंगभद्रेची काठी होदीगेरे येथे असतांना शहाजी शिकारीला गेले. त्यांचा घोडा भरवेगात असतांना पाय रनवेलीत अडकला आणि कोलमडला. शहजीचे प्रतापशाली प्रतापशाली जीवन संपले . जिजाऊ विधवा झाली. पण ती सती गेली नाही.  शिवाजीने जीजामातेशी विचार विनिमय केला . त्या धर्यशाली मातेचे आपल्या एकुलत्या एका पुत्रास कपटी आणि खुनी औरंगजेबाच्या भेटीस आग्रा येथे जाण्यास संमती दिली . शिवरायाने जिजाऊच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे सोपविली आणि ५ मार्च १६६६ साली राजगडवरून आग्राकडे प्रयाण केले . सिंहगड स्वराज्यात नाही याबद्धल जिजाऊस फारच वाईट वाटत होत . तिने शिवाजीस सिंहगड घेण्यास आग्रह केला. तानाजीने स्वप्रानाची आहुती देत सिंहगड ४ फेब्रुवारी १६७० साली काबीज केला. शिवाजीची राणी सोयराबाई राजगडावर प्रस्तुत झाली. २४ फेब. १६७० साली राजारामाचा जन्म झाला. पहिल्या सूर्यप्रतापी पुत्राच्या राज्यभिषेकाचा सोहळा ६ जून १६७४ साली बसले. सर्व उपाय थकले. १७ जून १६७४ बुधवार रात्री जिजामातेने डोळे मिटले. महाराजणवरचे मायेचे छत्र मिटले. स्वामी स्वराज्याच्या आईविना पोरका झाला.
जिजामाता स्वराज्याची स्पुर्ती होती. महाशक्ती होती. मातृशक्ती होती. मराठ्याने दोन छत्रपती घडविणारा आदर्श राजमाता होती. शिवाजीच्या अनुपास्तीत तीच राज्यकारभार बघत होती. न्यायनिवाडे करीत होती. गरजवंताना मदतीचा हात देत होती. तो काळ विचारात घेतला तर जिजाऊ ही प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजल्याची पालककर्ती राजमाता होती. अशा या राजमातेला कोट्यावधी वेळा नतमस्तक होवून विनम्र अभिवादन !
जय जिजाऊ !!             


                      श्रीमती बोर्डे एस.एस.
                न.प.मौलाना आझादविद्यालय  वैजापूर