मेजर सोमनाथ शर्मा (१९२३-१९४७) हे परमवीर चक्राचे पहिले मानकरी आहेत. सोमनाथ शर्माच्या काश्मीर मधील उत्तम कामगिरीमुळे त्यांना ह्या पदकाने गौरविण्यात आले . त्यांना पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना श्रीनगर विमानतळावर वीर मरण आले ही घटना १९४७-४८ मधील भारत पाक युद्धाच्या वेळेस काश्मीर मध्ये घडली .ते चौथ्या कुमाऊन रेजिमेंट मध्ये.
सोमनाथ शर्मांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ साली एका ब्राम्हण परिवारात भारतातील हिमाचल प्रदेशातील दाढ येथे झाला .त्यांचे वडील मेजर जनरल अमर नाथ शर्मा सैन्यातील वरच्या स्थरा वरचे अधिकारी होते त्यांचे बंधू . जनरल सुरेंद्र नाथ शर्मा, जनरल विश्व नाथ शर्मा आणि बहिण मेजर कमला तिवारी हे होते .त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण नैनिताल येथील शेरवूड महाविद्यालयात केले , नंतर त्यांनी रॉयल मिलिटरी अकादमी मध्ये प्रवेश घेतला .
३१ ऑक्टोबर, इ.स. १९४७ रोजी सोमनाथ शर्माची रवानगी श्रीनगरला झाली .त्यांच्या उजव्या हाताला हॉकी खेळताना दुखापत झाली असून सुद्धा ते युद्धासाठी श्रीनगरला गेले. ३ नोव्हेंबर १९४७ रोजी सोम नाथ शर्मांच्या तुकडीला काश्मीर खोऱ्यातील बदगाम येथे लढण्याचे आदेश देण्यात आले. तेथे त्यांच्या तुकडीस पाकिस्तानी सैन्याने वेढा घातला. शर्मांला कळून चुकले की पाकिस्तानी येथून पुढे सरकले तर श्रीनगरचा विमानतळ धोक्यात येईल.
शत्रूचा कडवा प्रतिकार करीत असताना एक तोफगोळा जवळच फुटल्याने शर्मांस वीर मरण आले. त्यांची शेवटची वाक्ये "शत्रू ५० यार्डात आलेला आहे. आमच्यापेक्षा अनेकपटीने संख्येत असून आम्ही भयानक गोळीबारास सामोरे जात आहोत. मी येथून एक इंचही मागे सरकणार नाही आणि अगदी शेवटचा जवान आणि शेवटची गोळी असेपर्यंत येथे आम्ही लढू." या दरम्यान १ बटालियन कुमाउँ रेजिमेंट बदगामला पोहोचली व त्यांनी शत्रूचा हल्ला परतवून लावला.