लिंग

लिंग (Gender)



लिंग  (Gender)  :-

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द पहा.
मुलगा खेळतो.
मुलगी खेळते.
वरील वाक्यांत मुलगा हे पुरुष जातीचे नाव आहे, व मुलगी हे स्त्री जातीचे नाव आहे.
माणसांमध्ये पुरुष व स्त्री असा भेद असतो.

तसेच,
घोडा खिंकाळतो.
घोडी खिकाळते.
वरील वाक्यांत घोडा हे नर जातीचे नाव आहे, व घोडी हे मादी जातीचे नाव आहे.
प्राण्यांमध्ये नर व मादी असा भेद असतो.

ज्या नामावरून  पुरुष  किंवा  स्त्री  जातीचा  बोध  होतो , त्यास लिंग असे म्हणतात .

नामाचे दोन प्रकार आहेत :-

पुल्लिंग ( तो ) Musculine
स्त्रीलिंग  ( ती ) Feminine


पुल्लिंग ( तो ) Musculine :- ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो , त्यास पुल्लिंग असे म्हणतात.  
उदाहरणार्थ : भाऊ , मामा  इत्यादी

पुल्लिंगी नामे 
तो  -  मुलगा
तो  -  लेखक
तो  -  बोका
तो  -  घोडा


स्त्रीलिंग  ( ती ) Feminine :- ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो , त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
उदाहरणार्थ : बहीण , मामी  इत्यादी

स्त्रीलिंगी नामे
ती  -  मुलगी
ती  -  लेखिका
ती  -  मांजर
ती  -  घोडी

लिंगबदल :-

पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नामात रूपांतर करणे व स्त्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नामात रूपांतर करणे , याला लिंगबदल असे म्हणतात.
(Note) लक्षात ठेवा :- वाक्यातील एखाद्या नामाचे लिंग बदलल्यास क्रियापदाचे रूपही अनेकदा बदलते.

उदाहरणार्थ :-
मुलगा खेळतो.     -->>    मुलगी खेळते.
बैल गवत खातो.  -->>   गाय गवत खाते.

१) समान पद्धतीने होणाऱ्या काही नामाचा लिंगबदल :-

अ)  ( अ, आ   <-->  ई )
 
पुल्लिंग
स्त्रीलिंग
काका 
काकी
पाहुणा   
पाहुणी
एकटा 
एकटी
चिमणा
चिमणी
काळा 
काळी
छोटा 
छोटी
चिमुकला
चिमुकली
चित्रकार
चित्रकर्ती
कणगा 
कणगी
पिवळा 
पिवळी
नवा
नवी
कोंबडा 
कोंबडी
कुमार
कुमारी
गाडा 
गाडी
कुत्रा
कुत्री
ओला
ओली
बकरा
बकरी
म्हातारा
म्हातारी
थैला
थैली
पक्षी
पक्षिणी
निळा
निळी
नद 
नदी
पोरगा
पोरगी
नाचरा
नाचरी
तरुण
तरुणी
कोल्हा
कोल्ही
बाहुला
बाहुली
थोरला
थोरली
देव
देवी
दोरा
दोरी
पावा
पावरी
मामा
मामी
मुलगा
मुलगी
राजकुमार
राजकुमारी
हिरवा
हिरवी
विद्यार्थी
विद्यार्थिनी
राग
रागिणी
वानर
वानरी
लांडगा
लांडगी
स्वामी
स्वामिनी
वेडा
वेडी
मेंढा
मेंढी
लाडका
लाडकी
हंस
हंसिनी
सखा
सखी
शहाणा
शहाणी
रेडा
रेडी
सावळा
सावळी


ब) ( अ, ई  <-->  ईण )
 

पुल्लिंगस्त्रीलिंग
शिपाईशिपाईन
सावकारसावकारीण
शिंपीशिंपीण
नागनागीण
उंदीरउंदरीन
पोपटपोपटीण
कुंभारकुंभारीण
वाघवाघीण
साप/सर्पसर्पीण
साहेबसाहेबीण
हत्तीहत्तीण
शेतकरीशेतकरीण
ससासशीण
सुतारसुतारीन
भिकारीभिकारीण
डुक्करडुकरीण


क)  ( अ  <-->   आ , इका )
 

पुल्लिंगस्त्रीलिंग
शिक्षकशिक्षिका
नायकनायिका
शिष्यशिष्या
प्राध्यापकप्राध्यापिका
लेखकलेखिका
बालकबालिका
सेवकसेविका
कोकीळकोकिळा
वृद्धवृद्धा
मुख्याधापकमुख्याध्यापिका
मार्गदर्शकमार्गदर्शिका
गायकगायिका
शिक्षकशिक्षिका



२) अनियमित पद्धतीने होणारे नामाचे लिंगबदल :-
 

पुल्लिंगस्त्रीलिंग
मामामामी
बाबा, वडीलआई
दादाताई
दादावहिनी 
पुतण्यापुतणी
विद्वानविदुषी
आजोबाआजी
युवकयुवती
राजाराणी
नर मादी 
नोकर नोकराणी
बैलगाय
पुत्रकन्या
गृहस्थ  गृहिणी 
बाप आई, माय
मोरलांडोर
पुरुष स्त्री, बाई
नवराबायको
विद्वान विदुषी 
वीर वीरांगना
मित्रमैत्रीण
मासा मासोळी
कवी कवियत्री 
माता पिता 
पुत्र कन्या 
रेडा म्हैस 
बोका मांजर, भाटी 
बोकडशेळी, बकरी
गृहस्थ  गृहिणी 
बेडूक बेडकी
साधू साध्वी
सर मॅडम
मुंगळा मुंगी
बुआ बाई
सासरासासू 
काळवीट हरिणी 
बंधू भगिनी