परमवीर
चक्र पुरस्काराविषयी माहिती
परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून
युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत
२१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर
आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान
केले गेले आहेत.
परमवीर
पुरस्काराची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी
करण्यात आली व हे पुरस्कार देण्याची सुरुवात 15 ऑगस्ट
1947
पासून करण्यात
आली. परमवीर चक्र हे जमिनीवर, हवेत किंवा
समुद्रामध्ये शत्रू समोर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी तसेच
आत्मत्यागाच्या पूर्वतयारीने दाखवलेले साहस व आत्मबलिदानासाठी दिले जाते.
परमवीर चक्र
कोणत्या कारणासाठी दिले जाते?
परमवीर चक्र हे जमिनीवर, हवेत किंवा
समुद्रामध्ये शत्रू समोर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी तसेच
आत्मत्यागाच्या पूर्वतयारीने दाखवलेले साहस व आत्मबलिदानासाठी दिले जाते.
परमवीर
चक्राची रचना
परमवीर चक्र हे सर्वात मोठे पदक परदेशी वंशाच्या एका महिलेने तयार केले होते आणि १९५० पासून ते मूळ स्वरुपातच आहे. या पदकाची रचना आणि त्यावर कोरलेल्या आकृत्या हे भारतीय संस्कृती आणि वीर देवतेचे संदर्भ आहेत. भारतीय वंशाच्या नसलेल्या “सावित्री खळोंकर उर्फ सावित्री बाई” यांना “मेजर जनरल हिरालाल अटल” यांनी भारतीय सैन्याच्या वतीने परमवीर चक्र निर्माण करण्याचे काम दिले होते.
परमवीर पुरस्कार मिळवलेले 21 जवान :
1.
मेजर
सोमनाथ शर्मा
2.
नाईक
जदुनाथ सिंह
3.
सेकंड
लेफ्टनंट रामा राघोबा राणे
4.
नायक
करम सिंह
5.
मेजर
पीरू सिंह
6.
कॅप्टन
गुरबचन सिंह
7.
मेजर
धनसिंह थापा
8.
सूबेदार
जोगिंदर सिंह
9.
मेजर
शैतान सिंह
10.
अब्दुल
हमीद मसऊदी
11.
लेफ्टनंट
कर्नल ए. बी. तारापोर
12.
लान्स
नाईक अल्बर्ट एक्का
13.
फ्लाईंग
ऑफिसर निर्मलजीत सिंह
14.
लेफ्टनंट
अरुण खेतरपाल
15.
मेजर
होशियार सिंह
16.
नायब
सुभेदार बन्ना सिंह
17.
मेजर
रामस्वामी परमेश्वरन
18.
लेफ्टनंट
मनोज कुमार पांडे
19.
ग्रेनेडिअर
योगेंद्रसिंह यादव
20.
सुभेदार
संजय कुमार
21.
कॅप्टन
विक्रम बत्रा